
इंडियन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सुरू झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्सचा मध्यरात्री ५ विकेट्सने पराभव केला.
या विजयासह पंजाब किंग्स आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये पंजाबने अंतिम सामना गाठला होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी पंजाबच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार श्रेयस अय्यर ठरला.