
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामना रोमांचक होत आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ससमोर मोठे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे.
मुंबईने २०४ धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.