
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत क्वालिफायर २ सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक निर्धारित वेळेतच झाली होती. पण सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर मध्येच ओसरत होता, तर मध्येच जोराची सर येत होती. त्यामुळे रात्री ९.३० वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही.