
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोण पोहचणार याची उत्सुकता लागलेली असतानाच क्वालिफायर २ सामन्यात पावसाने मात्र अडथळा आणला आहे. रविवारी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ सामना होत आहे.
या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला आयपीएल २०२५ अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास थांबणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो वा मरो सामना आहे.