
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोण खेळणार याची उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे.
रविवारी (१ जून) आयपीएल २०२५ स्पर्धेचा क्वालिफायर २ सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ बंगळुरूविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. ७३ सामन्यानंतर अखेर अंतिम दोन संघ निश्चित होणार आहेत.