
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून केवळ दोनच सामने बाकी राहिले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ रविवारी (१ जून) मिळणार आहे.
रविवारी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात क्वालिफायर २ सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ अंतिम सामन्यात पोहचणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिमय असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.