
इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेतील ६९ वा सामना सोमवारी (२६ मे) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जात आहे. जयपूरला होत असलेला हा सामना दोन्ही संघांचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना आहे. तसेच दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघ पहिल्या दोन क्रमांकामध्येच राहणार हे निश्चित आहे. तसेच पराभूत होणाऱ्या संघाला पहिल्या दोनमध्ये येता येणार नाही. म्हणजेच विजय मिळवणारा संघ क्वालिफायर १ खेळेल, तर पराभूत होणारा संघ एलिमिनेटरमध्ये खेळेल.