
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी कोण अंतिम सामन्यात सर्वात आधी प्रवेश करणार याची उत्सुकता आहे. गुरुवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे या स्पर्धेतील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ क्वालिफायर १ सामन्या आमने-सामने आहेत.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिला डाव त्यांच्या गोलंदाजीने गाजवला आहे. त्यांनी पंजाब किंग्सला १०० धावांसाठीही मोठा संघर्ष करायला लावला. या सामन्यात पंजाब किंग्सने बंगळुरूसमोर १०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात बंगळुरूच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून कामगिरी करताना अनेक धावा रोखल्या.