Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Updates: पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी हैदराबादमध्ये चौकार-षटकारांचे वादळ आणले. प्रियांश आर्या व प्रभसिमरन सिंग यांनी २४ चेंडूंत ६६ धावा चोपून सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचे खच्चीकरण केले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरची वादळी खेळी, म्हणजे लाजवाब... मार्कस स्टॉयनिसला शेवटच्या षटकांत शांत ठेवले असे वाटत असताना पठ्ठ्याने ४ चेंडूंत ४ षटकार खेचून हैदराबादला ६ बाद २४५ धावांपर्यंत पोहोचवले.