
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ४४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी अफलातून फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधल. त्यामुळे पंजाबने २०० धावांचा टप्पा पार करत कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
यंदाच्या हंगामात पंजाब किंग्स संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाबने ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या पंजाबला विजेतेपदाचा प्रबळ दावेदारही म्हटले जात आहे.