IPL 2025 Points Table: Five Teams Tied at 6 Points
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफच्या गणितीची आकडेमोड आतापासून सुरू झाली आहे. आयपीएल २०२५ मधील २२ सामने आतापर्यंत खेळवली गेली आहेत. चार संघांचे प्रत्येकी ४, पाच संघांचे प्रत्येकी ५ व एका संघाचे तीन सामने खेळून झाले आहेत. काल पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लढतीनंतर गुणतालिकेची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. PBKS vs CSK लढतीनंतरच्या गुणतालिकेत प्रत्येकी सहा गुण असलेले पाच संघ आघाडीवर आहेत. दोन संघांच्या खात्यात प्रत्येकी ४, तर तीन संघांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत.