
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार होता. सोमवारी (५ मे) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा हा सामना पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ पाँइंट देण्यात आला आहे.
यामुळे आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीमधून सनरायझर्स हैदराबाद अधिकृतरित्या बाहेर झाले आहेत. सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या माजी विजेत्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले आहे.