
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (२५ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध ८३ धावांनी मोठा विजय मिळवला. हा चेन्नई सुपर किंग्सला यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना असल्याने त्यांच्यासाठी शेवट गोड राहिला.
मात्र असे असले तरी ते शेवटच्या क्रमांकावर कायम राहिले. चेन्नईसाठी यंदाचा हंगामत विसरण्यासारखा होता. त्यांना इतिहासात पहिल्यांदाच पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर रहावे लागले आहे. चेन्नईला यंदाच्या हंगामात अनेक धक्के बसले, त्यात नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला स्पर्धेतूनही बाहेर व्हावे लागले.