
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर १ च्या लढतीत पंजाब किंग्सवर एकहाती विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. RCB ने तिसऱ्यांदा फायनल गाठली आणि यंदा ते जेतेपदाचा दुष्काळ संपवतील अशी चाहत्यांना आशा आहे. पण, जर मुंबई इंडियन्स फायनलला आली, तर त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंगू शकते, असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन याने केले आहे.