
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३) लखनौला झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे बंगळुरूचा नेट रन रेट घसरला असून ते दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावरही घसरले आहेत.
सध्या आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफमध्ये खेळणारे ४ संघ निश्चित झाले आहेत. बंगळरुसह गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आता या चार संघांमध्ये पहिल्या दोन क्रमांकांमध्ये येण्यासाठी चुरस आहे.