Virat Kohli loyalty to RCB rewarded with record
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्सला घरी बोलवून पराभूत केले. आयपीएल इतिहासात प्रथमच RCB ने CSK ला दोन्ही लीग सामन्यांत हरवण्याचा पराक्रम केला. आयपीएल २०२५ मध्ये बंगळुरूचा संघ १८ वर्षांत प्रथमच चेपॉकवर जिंकला होता आणि शनिवारी त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नईवर २ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूच्या ५ बाद २१३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ५ बाद २११ धावांपर्यंतच पोहोचता आले. या सामन्यात विराट कोहलीने ३३ चेंडूंत ६२ धावांची खेळी करताना ५ चौकार व ५ षटकार खेचले. त्याच्या या षटकारांनी मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.