
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ८ विकेट्सने पराभूत केले आहे. बुधवारी (२ एप्रिल) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला.
गुजरातचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे आता त्यांचे ४ पाँइंट्स झाले आहेत. बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. पण गुजरातच्या या विजयाने पंजाब किंग्सला पाँइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.