
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील १४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळवला जात आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडिमयवर खेळवला जात आहे.
बुधवारी (२ एप्रिल) होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूला गुजरातसमोर १७० धावांचे माफक लक्ष्य ठेवता आले आहे. गुजरातकडून माजी बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याला इतर गोलंदाजांचीही साथ मिळाली. पण बंगळुरूसाठी लियाम लिव्हिंगस्टोनची फटकाबाजी महत्त्वाची ठरली.