
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १३ वा सामना मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सने ८ विकेट्सने विजय मिळवला.
हा पंजाबचा सलग दुसरा विजय ठरला असून त्यांनी पाँइंट्स टेबलमध्येही थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पण रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौला मात्र तीन सामन्यांतील दुसऱ्या पराभवाला समोरे जावे लागले. यानंतर प्रीती झिंटा संघमालकीण असलेल्या पंजाब किंग्सने रिषभ पंतला अनोख्या पद्धतीने ट्रोल केले आहे.