
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी धमाकेदार कामगिरी करत इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत केले.
या विजयासह त्यांनी अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले. बंगळुरू आयपीएल २०२५ मध्ये अंतिम सामन्यात पोहचलेला पहिला संघ ठरला आहे.
तसेच बंगळुरूची ही अंतिम सामन्यात पोहचण्याची एकूण चौथी वेळ आहे. यापूर्वी २००९, २०११ आणि २०१६ साली त्यांनी अंतिम सामना गाठला होता. मात्र तिन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा आता ते पहिले विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न ३ जूनला अहमदाबादमध्ये करतील. ३ जून रोजी अहमदाबादला अंतिम सामना होणार आहे.