Drake places 6.4 crore bet on RCB in IPL 2025: आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, या हायव्होल्टेज लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. गेल्या 18 वर्षांपासून दोन्ही संघांपैकी एकालाही आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.