
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून अंतिम ४ संघही निश्चित झाले आहेत. पण तरी पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. ही चुरस साखळी फेरीच्या शेवटच्या आठवड्यात पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या सामन्यातून बंगळुरूला अव्वल स्थान मिळण्याची अपेक्षा आहे, तर हैदराबाद प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत. बंगळुरूने आधीच प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे.