KKR vs RR Live : कोलकाता नाइट रायडर्सचा थरारक विजय! रियान परागचे शतक हुकले अन् अजिंक्यचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहिला

IPL 2025 KKR vs RR Marathi News: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना थरारक ठरला. रियान परागने जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, पण त्याचं शतक केवळ काही धावांनी हुकलं.
KKR defeat RR in close match to keep playoff hopes alive
KKR defeat RR in close match to keep playoff hopes aliveesakal
Updated on

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना रोमहर्षक झाला. कोलकाताच्या २०६ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने ७१ धावांवर निम्मा संघ गमावला होता. तिथून त्यांनी पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकापर्यंत मॅच रंगतदार अवस्थेत ठेवली. कर्णधार रियान परागने ( Riyan Parag) अविश्वसनीय फलंदाजी करताना RR च्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, त्याच्या विकेटने त्या मावळल्याही. तरीही शुभम दुबेने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली. एका धावेने कोलकाताने ती जिंकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com