
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १८ हंगाम जोशात सुरू आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा पडला असून आता दुसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीनेही शर्यत रंगतदार होण्यास सुरूवात झाली आहे.
अशातच बीसीसीआयने आयपीएलमध्ये एक नवीन सदस्य आणला आहे. हा सदस्य म्हणजे रोबोटिक डॉग अर्थात यांत्रिक कुत्रा. रिमोटवर या कुत्र्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याच्याबद्दल फक्त चाहत्यांमध्येच नाही, तर खेळाडूंमध्येही कुतूहल दिसून येत आहे. मैदानावर तो दिसताच, त्याच्यासोबत खेळाडू मस्तीही करत आहेत.
आता त्याला आयपीएलकडून नावही देण्यात आले असून त्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने गमतीशीर प्रतिक्रियाही दिली आहे. तसेच त्याचं नाव ऐकून अनेकांना तारक मेहता का उल्टा चश्मा या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचीही आठवण झाली आहे.