
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आठराव्या हंगामातून आता तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर झाले आहेत. पण असे असतानाच अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचाही फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम सुरू असतानाच त्यांना संघात बदल करावे लागले आहेत.
यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण त्यांनीही शेवटच्या टप्प्यात संघात बदली खेळाडूंचा समावेश केला आहे.