RR vs CSK Live Match Marathi Update: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा रविवारचा दुसरा सामना खेळवला जातोय. कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून पुन्हा लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. RCB विरुद्धच्या सामन्यातही नाणेफेक जिंकून ऋतुने असाच निर्णय घेतला होता आणि त्याचा निकाल काल लागला, हे सर्वांना पाहिले. त्यामुळे ऋतुच्या निर्णयावर पुन्हा नाराजी व्यक्त केली जातेय. चेन्नईने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. जेमी ओव्हरटन व विजय शंकर यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यासाठी सॅम करन व दीपक हुडा यांना बसवले आहे.