
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील सर्व संघांचे पहिले सामने खेळून झाले आहेत. आता या स्पर्धेतील सहावा सामना बुधवारी (२६ मार्च) राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे.
हा सामना राजस्थानने घरचं मैदाना म्हणून स्वीकारलेल्या बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे होत आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.