Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: राजस्थान रॉयल्स संघाला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मोठा धक्का बसला आहे. गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानचे प्ले ऑफचे स्वप्न जवळपास भंगले आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांतील निकाल हे त्यांना पुढील पर्वाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. १० सामन्यांत त्यांना केवळ ३ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित चार सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. तरीही नेट रन रेटवर गणित अवलंबून असणार आहे. अशात त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आजच्या लढतीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.