What are the new IPL 2025 rules of temporary replacement players? भारत-पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमिअर लीग २०२५ येत्या शनिवारपासून सुरू होतेय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने आयपीएल पुन्हा सुरू होतेय. पण, युद्धजन्य परिस्थितीमुळे बरेच खेळाडू परदेशात परतले आहेत आणि त्यांच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे आयपीएलने जुगाड केला आहे आणि परत न येणाऱ्या खेळाडूंच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून येणाऱ्या खेळाडूंसाठी नवा करार आणला आहे.