
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५५ वा सामना सोमवारी (५ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात हैदाराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळताना सनरायझर्स हैदराबादने शानदार गोलंदाजी करताना दिल्लीला १३३ धावांवरच रोखले आहे.
त्यामुळे आव्हान संपण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हैदराबादसमोर १३४ धावांचेच माफक आव्हान आहे. पण सनरायझर्स हैदराबाद धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरण्याआधीच पावसाचा अडथळा आला आहे.