
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (५ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आहेत. हैदराबादला होत असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी कोलमडल्याचे दिसले. त्यांना हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने मोठे धक्के दिले.
त्यामुळे कसेबसे दिल्ली कॅपिटल्सने १०० धावा पार केल्या. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्माने केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली. दिल्लीने हैदराबादसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.