
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५५ वा सामना सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जात आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हैदराबादचे आव्हान अद्याप संपलेलं नाही, पण जवळपास त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. पण तरी ते देखील असलेलं आव्हान कायम ठेवण्यासाठी उत्सुक असतील.