
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ६८ वा सामना सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी मैदानात दणाणून सोडले.
या दोघांनीही वादळी खेळ करताना संघाला शेवटच्या सामन्यात केलेल्या आक्रमणामुळे संघ सहज २५० पार पोहचला. क्लासेनने तर शतकी खेळी केली. हैदराबादने कोलकातासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हे यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लक्ष्य आहे.