
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली असून दुसरा सामना सनराझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रविवारी खेळला जात आहे. रविवारी डबल हेडर असल्याने हा सामना दुपारी खेळला जात आहे.
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर २८७ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून इशान किशनने पदार्पणातच शतक ठोकलं. आता जर राजस्थानला सामना जिंकायचा असेल, तर त्यांना आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे.