
India Pakistan War: भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणस्तव हा निर्णय घेत असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता विदेशी खेळाडूंना परत पाठवलं जाणार असल्याचीही माहिती आहे.