
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा ९ मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजनक परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आली होती. पण परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर साधारण ८ दिवसांनी १७ मे पासून आयपीएल २०२५ स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली.
पण मधल्या ८ दिवसात अनेक खेळाडू घरी परतले होते. पण आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याने खेळाडूंना लगेचच माघारी परतावे लागले आहे.
मात्र काही खेळाडू आता बदललेल्या वेळापत्रकामुळे उपलब्ध राहू शकलेले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांच्या खेळाडूंवर परत जायचे की नाही, हा निर्णय सोपवला आहे.