Operation Sindoor नंतर पाकिस्तान चवताळला आहे आणि युद्धाची भाषा करू लागला आहे. २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने काल मध्यरात्री पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर शेजाऱ्यांचा जळफळाट झाला आहे आणि ते युद्धासाठी तयारी करत आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्यालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग २०२५ रद्द होईल का? अशा प्रश्न काहींना पडला आहे आणि बीसीसीआयने त्याबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत.