
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पार पडला. चेपॉकला झालेल्या या सामन्यात बंगळुरूने ५० धावांनी विजय मिळवला होता.
बंगळुरूने चेपॉकवर तब्बल १७ वर्षांनी सामना जिंकला. दरम्यान, या सामन्यातील काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत, यातील एक विराट कोहली आणि रवींद्र जडेजचा आहे.