
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ६८ वा सामना सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात रविवारी (२५ मे) पार पडला होता. दिल्लीत झालेल्या या सामन्यात हैदराबादने तब्बल ११० धावांनी विजय मिळवला.
हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील अखेरचा सामना होता. या सामन्यात हैदराबादने दिलेल्या २७९ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १८.४ षटकातच १६८ धावांवर सर्वबाद झाला.