

Auqib Nabi
esakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावात जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिकेटपटू आकिब नबी दार याने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ८.४० कोटी रुपयांचा करार मिळवला. या मोठ्या यशामुळे त्यांच्या उत्तर काश्मीरमधील शेरी शहरात प्रचंड आनंदाची लहर पसरली. बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि मित्र त्यांच्या घरी एकत्र जमले. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात नाचण्याचा आणि जल्लोष सुरू झाला. कुटुंबाने मिठाई वाटून आनंद द्विगुणित केला.