

Impact Player rule
esakal
Impact Player Rule: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चे सामने अधिक अधिक रोमांचित होत चालले आहेत. अनेक सामने हाय स्कोरिंग पाहायला मिळाले आहेत. आयपीएलचा चर्चित इम्पॅक्ट प्लेयरचा(impact player) नियम देखील या हंगामात महत्त्वाचा ठरत आहे, परंतु अनेक खेळाडूंना हा नियम फारसा आवडलेला नाही.
आता हा नियम लवकरच बंद पडण्याची शक्यता आहे. यंदाचा आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) यावर लवकरच विचार केला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया(Devajit Saikia) यांनी या बाबत माहिती दिली आहे. परंतु आयपीएल टीम्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही असे सचिव देवजित म्हणाले.