

Mumbai Indians vs Punjab Kings
sakal
मुंबई : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात निराशेला सामोरे जावे लागत आहे. सलामीच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी मुंबईच्या संघाला आज (ता. १६) होत असलेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. मुंबईचा संघ वानखेडे या घरच्या स्टेडियमवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसेल.