

Ravi Shastri Makes Major Toss Error
esakal
Ravi Shastri Makes Major Toss Error: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा ६० वा सामना शनिवारी गुजरात टायटन्स(GT) आणि कोलकाता नाईट रायडर्स(KKR) यांच्यात रंगला. सामन्यादरम्यान भारतीय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) यांच्याकडून एक मोठी चूक झाली. गुजरात आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलनने सुरुवातीला मिळालेल्या दोन जीवदानांचा फायदा उचलत ३५ चेंडूंमध्ये ९३ धावांची धडाकेबाज खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सने या हंगामातील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली.