

Viral Video
esakal
Viral Video: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा ३६ वा सामना शनिवारी २५ एप्रिलला राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या राजस्थानने आपल्या निर्धारित २० षटकांत २२८ धावा करत हैदराबादसमोर २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं. ज्यात राजस्थान संघाचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीने शानदार शतक झळकावलं. वैभवने ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या.