

Virat Kohli
esakal
इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB )खास ठरली. त्यांनी सनरायझर्स हैदराबादला ६ विकेट्सने नमवत विजयाने श्रीगणेश केला. यात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने जबरदस्त फलंदाजी करत शतकी भागेदारी केली. नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम गोलंदाजी केली, सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही धडाकेबाज केली. सुरुवातीलाच पदार्पण करणारा जेकब डफीने ३ विकेट्स घेत सनरायझर्स हैदराबादच कंबरडं मोडल.