IPL Final 2023 CSK vs GT : कितीही पाऊस पडू दे, फक्त 30 मिनिटात होतं नरेंद्र मोदी स्टेडियम कोरडं!

IPL Final 2023 CSK vs GT
IPL Final 2023 CSK vs GT esakal

Narendra Modi Stadium IPL Final 2023 CSK vs GT : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदात फायनल ही राखीव दिवशी होणार आहे. जगातील सर्वात मोठे आणि अद्यावत स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. जरी नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल पावसामुळे सामना होऊ शकला नसला तरी जर पावसाने थोडी जरी उसंत दिली असती तर ग्राऊंड्समननी नरेंद्र मोदी स्टेडियम अर्ध्या तासात खेळण्यासाठी तयार केलं असतं.

IPL Final 2023 CSK vs GT
MS Dhoni Fan IPL Final : धोनीसाठी चाहते रल्वे स्टेशनवरही झोपले... काहींना मिळाला विराटचा आडोसा

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे पुनर्निर्माण झाले त्यावेळी हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम करण्याबरोबरच त्याची ड्रेनेज व्यवस्था देखील अद्यावत करण्यात आले. यामुळे मोठ्या पावसानंतर देखील हे स्टेडियम लवकरात लवकर खेळण्यायोग्य होते. मैदान कोरडं करण्यासाठी ग्राऊंड्समनना 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

मैदानावर 8 सेंटीमीटर इतका पाऊस झाला तरी खेळ 30 मिनिटात सुरू करता येऊ शकतो. यासाठी मैदानाची खेळपट्टी आणि गवताच्या खाली वाळूचा एक थर पसरवण्यात आला आहे. त्यामुळे इतर स्टेडियमपेक्षा नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाणी वेगाने खाली शोषूण घेतले जाते. त्यामुळे मोठ्या पावसानंतरही या स्टेडियमवर सामना लवकर सुरू करण्यास फार वेळ लागत नाही. मैदानावरील सुपर तोपर देखील उरले सुरले पाणी लगेचच शोषूण घेतात.

IPL Final 2023 CSK vs GT
MS Dhoni IPL 2023 : 'कर्णधार नसेल तर तो संघातही...', धोनीवर भारतीय दिग्गज खेळाडूने केले मोठे वक्तव्य

मात्र कालच्या सामन्यात पावसाने साधी नाणेफेक देखील होऊ दिली नाही. तरीही पाऊस काही काळ थांबला होता त्यावेळी लगेचच विटेकवरील कव्हर हटवण्यात आले होते. समालोचन करणाऱ्या इरफान पठाणने मैदानावर इतका पाऊस पडून देखील मैदान ओलं नसल्याचे दाखवून दिले होते.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com