IPL Final 2023: आयपीएलची फायनल पाहण्यासाठी अहमदाबादेत रमले राजकीय विरोधक! फोटो व्हायरल

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदामध्ये अंतिम सामना खेळला जात आहे.
IPL
IPL

IPL Final 2023: इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगला आहे. आयपीएलचे चाहत्यांचा स्टेडिअममध्ये नुकता दंगा सुरुए पण यामध्ये महाराष्ट्रातील एकमेकांचे राजकीय विरोधक एकत्र जमल्याचं दिसून आलं. हा सामनाही ते एन्जॉय करत आहेत. याचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (IPL Final 2023 Political opponents flocked to Ahmedabad to watch the IPL final photo viral)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तसेच एमसीएचे सदस्य मिलिंद नार्वेकर, भाजपचे आमदार तथा बीसीसीआयचे सरचिटणीस आशिष शेलार, राष्ट्रवादीचे आमदार आणि एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक असे सर्वजण आयपीएलचा अंतिम सामन्याचा आनंद लुटत आहेत. (IPL Final 2023)

IPL
Gujrat News: 2000 रुपयांच्या 8 लाखांच्या बनावट नोटा जप्त! बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक

एकीकडं विरोधी पक्षांमधील कार्यकर्ते किरकोळ कारणांसाठी अनेकदा एकमेकांमध्ये भिडताना आपल्याला दिसतात. पण या कार्यकर्त्यांचे नेते मात्र अशा प्रकारे अनेकदा एकत्र येऊन मैत्रीपूर्ण संबंध पार पाडताना दिसतात, अशी चर्चा या फोटोमुळं सोशल मीडियात रंगल्याचं पहायला मिळालं. खुद्द रोहित पवार यांनी हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये बीसीसीआयची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच MCAच्यावतीनं राज्यात १५ ते २९ जून दरम्यान एमपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक करताना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com