IPL Final 2023 : पन्नासपेक्षा जास्त कॅमेरे असणार तैनात; आयपीएलची फायनल दिसणार दमदार

IPL Final 2023
IPL Final 2023 esakal

IPL Final 2023 : आयपीएलची फायनल अवघ्या काही तासांवर आली आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील फायनलची क्रेज खूप वाढली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पाचवे विजेतेपद पटकावून आपल्या आयपीएल कारकिर्दिची दमदार सांगता करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्स आपल्या होम ग्राऊंडवर खेळत आहे. गुजरात सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या हा धोनीला आपला गुरू मानतो. त्यामुळे आजच्या सामन्याकडे गुरू - शिष्य लढत असेही पाहिले जात आहे.

IPL Final 2023
MS Dhoni : "माझ्या प्रिय थाला, जेव्हा तू..." CSK-GT सामन्यापूर्वी आयपीएल, सीएसके धोनीसाठी भावुक

आयपीएलच्या या हाय व्होल्टेज फायनल सामन्याच्या दर्जेदार प्रक्षेपणासाठी प्रक्षेपण करणाऱ्या टीमने चांगलीच कंबर कसली आहे. प्रक्षेपण करणाऱ्या टीमचे प्रॉडक्शन आणि ब्रॉडकास्टर डायरेक्टर देव श्रीयान यांचा एक व्हिडियो आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत श्रीयान यांनी सांगितले की, जवळपास 50 पेक्षा जास्त कॅमेरे ही फायनल कव्हर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com