डगमगत्या 'टायटन्स'ला कॅप्टननं सावरलं; पांड्याची नाबाद फिफ्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Titans Captain Hardik Pandya

डगमगत्या 'टायटन्स'ला कॅप्टननं सावरलं; पांड्याची नाबाद फिफ्टी

नवी मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना गुजरात टायटन्सची (Gujarat Titans ) सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू वेड 12 धावा करुन रन आउट झाला. शुबमन गिलही स्वस्तात तंबूत परतला. सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कॅप्टननं डगमगणारे नौका सावरली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 87 धावांची खेळी करत आयपीएल (IPL) कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्याने आपल्या डावात 52 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) निर्धारित 20 षटकात 4 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली. यंदाच्या हंगामातील हार्दिक पांड्याचे हे दुसरे अर्धशतक आहे.

हेही वाचा: आठ कोटींचा गडी बाकावर; MI कसं जिंकणार? जाफरचा टोला

हार्दिक पांड्याची आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2019 च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने 34 चेंडूत 91 धावांची खेळी केली होती. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. 2015 मध्ये हार्दिक पांड्याने कोलकाता विरुद्धच 31 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या होत्या. याशिवाय गत हंगामात अबुधाबीच्या मैदानात त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 21 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा: VIDEO : भर मैदानात जॉन्टी ऱ्होड्सनं धरले सचिन तेंडुलकरचे पाय

यंदाच्या मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पांड्याला रिलीज केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स या नव्या फ्रेंचायझीनं त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले. त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. एवढेच नाही तर पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्याची कामगिरीही कमालीची उंचावली आहे. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही तो चमक दाखवून टीम इंडियात एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचे संकेत तो प्रत्येक सामन्यातून देत आहे.

Web Title: Ipl Gujarat Titans Captain Hardik Pandya Not Out 87 His 6th Fifty In Ipl Against Rajasthan Royals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top