IPL मधील टॉप 10 वेगवान चेंडू कोणी कोणी टाकलेत माहितीये?

fastest balls in the history of IPL
fastest balls in the history of IPL Sakal

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्झ हैदराबादकडून खेळणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाज उमरान मलिक याने 153.3 kmph वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला. यंदाच्या हंगामात नोर्तजे आणि रबाडाला जे जमलेलं नाही ते या पठ्यानं करुन दाखवलं. आयपीएलच्या इतिहासात भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकणारा विक्रम उमरान मलिकच्या नावे झाला आहे. आयपीएलमध्ये टॉप टेन वेगवान चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत येण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन शॉन टेट. दक्षिण आफ्रिकेचा नोर्तजे, रबाडा आणि डेल स्टेन आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर यांनी टाकलेल्या वेगवान चेंडूचा टॉप टेनमध्ये समावेश आहे. नोर्तजेनं पाच वेळा वेगवान चेंडू टाकलाय. रबाडाने दोन तर अन्य गोलदाजांनी प्रत्येकी एकदा वेगवान चेंडू टाकून टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं आहे. नजर टाकूयात आयपीएलच्या इतिहासात कोणत्या गोलंदाजाने कधी आणि किती वेगाने चेंडू टाकला होता यावर एक नजर......

शॉन टेट (Shaun Tait)

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज शॉन टेट याच्या नावे आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करताना दिल्ली डेअरडेविल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध 12 एप्रिल 2017 राजी सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात त्याने 157.71 kmph वेगाने चेंडू टाकला होता.

fastest balls in the history of IPL
सलून चालवणाऱ्याच्या पोरानं आयपीएलमध्ये काढलं बापाचं नाव

अ‍ॅनरिच नोर्तजे (Anrich Nortje)

आयपीएलमध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम हा नोर्तजेच्या नावे आहे. आयपीएल 2020 च्या हंगामातील 14 आक्टोबरला दुबईच्या मैदानात रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 155.21 kmph आणि 154.74 kmp वेगाने चेंडू टाकला होता. याच सामन्यातील तिसऱ्या षटकात त्याने बटलरला 156.22 kmph वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. याशिवाय त्याने 153.72 kmph या वेगाने टाकलेला चेंडूही पहिल्या टॉप टेन जलगती चेंडूत आहे.

डेल स्टेन (Dale Steyn)

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि 'स्टेनगन' याने नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेल स्टेनने टाकलेला चेंडूही टॉप टेनमध्ये आहे. डेक्कन चार्जर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या स्टेन याने 2014 च्या हंगामात डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधीत्व करताना 154.40 kmph वेगाने चेंडू टाकला होता. 2103 मध्ये त्याने 152.48 kmph आणि 2014 मध्ये 152.44 kmph वेगाने त्याने चेंडू फेकला होता.

fastest balls in the history of IPL
CSK विरूद्ध विराटला रोहित सारखा 'विक्रम' करण्याची संधी

कगिसो रबाडा (Kagiso Rabada)

दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा याने टाकलेला चेंडूही आयपीएलमधील टॉप टेनमध्ये समाविष्ट आहे. रबाडाने आयपीएलमध्ये 154.23 kmph आणि 153.91 kmph वेगाने चेंडू फेकले आहेत.

जोफ्रा आर्चर (Jofra Archer)

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल हंगामात सहभागी झालेला नाही. तो दुखापतग्रस्त असतानाही मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम देऊन त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होतं. रबाडाची सातत्याने 150 kmph वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. त्याने 153.62 kmph वेगाने टाकलेला चेंडू टॉप टेनमध्ये समाविष्ठ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com